आयुर्वेद व योगदर्शन

Author(s): Mrs Hemlata Dhokte (Kshirsagar)

Abstract:

आयुर्वेद व योगदर्शन ही भारतीय ज्ञानपरंपरेतील दोन अत्यंत प्राचीन, समन्वयात्मक व परस्परपूरक शास्त्रे आहेत. आयुर्वेद हे जीवनशास्त्र (Science of Life) असून त्याचा मुख्य उद्देश स्वस्थ व्यक्तीचे आरोग्य रक्षण व रोगी व्यक्तीचे विकार प्रशमन करणे हा आहे. तर योगदर्शनाचा उद्देश मन, इंद्रिये व चित्त यांचा निग्रह करून आत्मिक उन्नती व मोक्षप्राप्ती साधणे हा आहे. योगदर्शनात मांडलेला अष्टांगयोग १) यम, २) नियम, ३) आसन, ४) प्राणायाम, ५) प्रत्याहार, ६) धारणा, ७) ध्यान व ८) समाधी हा मानवी व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाचा शास्त्रीय मार्ग आहे. आयुर्वेदातील स्वस्थवृत्त, सद्वृत्त, आचार-रसायन व सत्त्वावजय चिकित्सा ही तत्त्वे अष्टांगयोगाशी पूर्णतः सुसंगत असून दोन्ही शास्त्रे देह–मन–आत्मा यांचे संतुलन साधण्यावर भर देतात. आयुर्वेद देहप्रधान असला तरी तो मन व आत्म्याला समान महत्त्व देतो, तर योगदर्शन मनप्रधान असून देहशुद्धीशिवाय योगसाधना शक्य नाही. त्यामुळे आयुर्वेद व योगदर्शन यांचा समन्वय केल्यास शारीरिक आरोग्य, मानसिक शांती व आत्मिक प्रगती साध्य होते. आधुनिक काळातील तणाव, जीवनशैलीजन्य विकार व मानसिक असंतुलन यावर आयुर्वेद–योगदर्शनाचे संयुक्त अध्ययन व आचरण अत्यंत उपयुक्त ठरते.

PDF URL: View Article in PDF